कोल्हापूर (प्रतिनिधी) : वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एन. टी. ए.) मार्फत दि. १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या नीट-२०२० परीक्षेचा निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला आहे. या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या चाटे कोचिंग क्लासेस व चाटे ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत व्यंकटेश शिवलिंग राजमाने ६६२ गुण मिळवून याने समूहामध्ये प्रथम, ओंकार कळंबे याने ६५१ गुण मिळवून द्वितीय तर देवेंद्र बिडकर याने ६४७ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.  

या परीक्षेतील गुणांमुळे ५४९ कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. साठी ७८३३३, ३१३ कॉलेजमध्ये बी.डी.एस. साठी २६९४ आणि ९१४ कॉलेजमध्ये आयुषसाठी ५२७२० विद्यार्थ्यांना वैद्यकीय कोर्सेसना प्रवेश घेता येणार आहे. चाटे शिक्षण समूहाच्या चाटे कोचिंग क्लासेस व चाटे ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्याथ्र्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत वरील विद्यार्थ्यांसोबत समूहाच्या ३० विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे.

कु. नियती वेंबवी (६१७ गुण), सुदर्शन पाटील (६१५ गुण), कु. साक्षी दळवी (५९१ गुण), सुरज मोराळे (५८५ गुण), कु. प्रिया नाकाडे (५८१ गुण), कृणाल नष्टे (५७७ गुण), हरीष केदार (५७७ गुण), पुरब खोपडे (५७१ गुण), कु. रूची पाटील (५६२ गुण), कु. वैष्णवी जाधव (५५४ गुण), शोएब अत्तार (५४३ गुण), वरूण जोशी (५४० गुण), उद्धव नागरगोजे (५३९ गुण), सत्यशील खाडे (५२९ गुण), विश्वजीत मोटे (५२३ गुण), ध्रुव दाबके (५२० गुण), कु. क्षितिजा मोदी (५१८ गुण), कु. अनुजा कदम (५१० गुण), हार्दिक साखळीकर (५०६ गुण), कु. अंकिता सिंग (५०४ गुण), कु. मनस्वी डकरे (५०१ गुण), प्रथमेश डकरे (४८६ गुण), अरिफ शेख (४८२ गुण), विनित कांबळे (४७६ गुण), कु. ऋतुजा पाटील (४७२ गुण), सिद्धार्थ कांबळे (४६७ गुण), किरण मोराळे (४६२ गुण), अथर्व कुलकर्णी (४५४ गुण), विवेक बरगाजे (४५० गुण).

समूहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, क्लासचे सर्व शाखा व्यवस्थापक, प्राचार्य, शैक्षणिक विभागप्रमुख व समूहाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.