कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे शहरातील सर्वच भाजी विक्रेत्यांनी ‘मास्क नाही, भाजीपालाही नाही’, अशी भूमिका घेऊन ती कठोरपणे राबवावी, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

त्या म्हणाल्या, शहरातील फळ आणि भाजीविक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दी करु न देणे या गोष्टींचे काटेकोर पालन करावे. कोरोना कमी झाल्याचे दिसत असले तरी त्याचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्वच्छता अभियानातून कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.