बोरपाडळे (प्रतिनिधी) : येथील आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर संचालित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणार्‍या शा. कृ. पंत वालावालकर हायस्कूलमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना लसीकरण करण्यात आले.

मुक्त सैनिक वसाहत परिसरातील पन्नासहून अधिक बालकांनी याचा लाभ घेतला. मोहीम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक महावीर मुजबिदीकर यांनी सहकार्य केले. या उपक्रमात बालक मंदिरच्या शिक्षिका तसेच हायस्कूलच्या सुरेखा पोवार, मोरबाळे, शीतल गणेशाचार्य आणि आरोग्य विभागाचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.