लाईव्ह मराठी ( सुमित तांबेकर ) उद्धव सेनेने आज जनतेचं न्यायालय या आशयाखाली आज एक बैठक घेतली असून, या बैठकीत तत्कालीन शिवसेनेतील पक्षांतर्गत झालेल्या निवडीचे व्हिडीओ सादर केले आहेत, यावेळी पक्षांतर्गत करण्यात आलेल्या नेत्यांची माहिती आणि याबाबतचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती ही सादर करण्यात आल्या आहेत.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रसिद्ध कायदेज्ज्ञ असिम सरोदे यांनी एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख पळून गेलेला गट असा करत एकनाथ शिंदे गटाला धू धू धूतलं. तसेच पक्षांतरबंदी कायद्याचा नेमका अर्थ काय आहे ? याचा अर्थ नेमका कसा अभिप्रेत आहे. आणि निर्णय प्रक्रियेत तो कसा अवलंबला जावा ? याबाबत स्पष्टीकरण दिलं. आणि अपात्र आमदारांच्या निर्णयाबाबत राहुल नार्वेकर यांनी अन्यायालाच न्याय हे नाव देत याचा निवाडा केला असल्याचं घणाघात केला.

दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना नेते अनिल परब यांनी शिवसेनेच्या झालेल्या निवडणूका, राष्ट्रीय कार्यकारीणीतील झालेले निकाल आणि त्याचे पुरावे सादर केले. तसेच कोणत्या कोणत्या नेत्यांची निवड करण्यात आली होती. याबाबत सर्वांसमोर पुरावे सादर केले, दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड झालेला व्हिडीओ ही यावेळी प्रसिद्ध करण्यात आला.

परब पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 1999 पासून शिवसेनेकडून घटनादुरुस्ती सादर केली नसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकर यांनी नाकारली त्याच घटनादुरुस्तीला राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. याबाबतचा व्हिडिओ सुद्धा यावेळी दाखवला. तसेच 2013 मध्ये शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक आणि कार्यकारिणीचे ठराव वाचून दाखवले. त्यामुळे यावर शिंदेसेना काय पलटवार करते ? हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.