कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आज (सोमवार) २३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आजअखेर एकूण ३६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या (मंगळवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी सर्वसाधारण गटातून दहा, महिला प्रवर्गातून सात, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एक, नागरिकांचा इतर मागास प्रवर्गातील चार, भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्गातून एक अशा एकूण तेवीस जणांनी आज आपले अर्ज मागे घेतले. आजपर्यंत एकूण ३६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.