कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या आदेशानुसार शाहू मार्केट यार्डामधील शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे सर्व दैनंदिन व्यवहार आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी आणि बाजार आवारातील गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीस सर्व व्यवहार सकाळी ७ ते ११ सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शाहू मार्केट यार्डामधील गूळ, शेंग, कांदा-बटाटा, लसूण, फळे-भाजीपाला, धान्ये-कडधान्ये, चिवा-बांबू या नियमित शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे सर्व दैनंदिन व्यवहार आता सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहेत.