कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी मातृकेच्या स्वरुपात पुजा बांधण्यात आली.

वैष्णवी मातृका ही पालनकर्ता भगवान विष्णूंची शक्ती आहे. ही गरुडावर बसलेली असून तिला चार ते सहा हात असलेली आहे. तिने शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेले आहे. तर भगवान विष्णूंच्या प्रमाणे ती दागिन्यांनी आणि किरीट मुकुटांनी सजलेली आहे. ही पूजा श्रीपूजक मयुर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी बांधली आहे.