कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या आज (शनिवार) मोबाईल व्हॅनद्वारे झालेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मोहिमेत सदर बाजार येथील ३ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर ८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मोहीम सुरू आहे. आज सदर बाजार परिसरात एकूण ८९ जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये ३ तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.