कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या सरी कोसळतच आहेत. पण दोन दिवसांपासून काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही तीन बंधारे अजूनही पाण्याखालीच आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.


पंचगंगा नदीवरील रूई, इचलकरंजी आणि भोगावती नदीवरील खडक कोगे असे एकूण तीन बंधारे पाण्याखाली आहेत. जांबरे, चिकोत्रा मध्यम आणि दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. प्रमुख धरणातील पाणीसाठा दशलक्षघनमीटरमध्ये असा : तुळशी ९८.२९, वारणा ९७४.१९, दूधगंगा ७१९.१२, कासारी ७८.०४, कडवी ७०.३०, कुंभी ७६.५२, पाटगाव १०५.२४२, चिकोत्रा ४३.११५, चित्री ५३.२३८, जंगमहट्टी ३४.६५१, घटप्रभा ४४.१७०.
दरम्यान, रविवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस असा : हातकणंगले २.१३, शिरोळ २, पन्हाळा २.१४, शाहूवाडी ६.६७, राधानगरी ६.६७, गगनबावडा १३, करवीर ४, कागल ८.५७, गडहिंग्लज ५.१४, भुदरगड ४.४०, आजरा ८, चंदगड ६.