मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान विरोधी एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा वार प्रतिवार पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांविरोधात अनेक खुलासे करत असतात. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे .आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर भाजपने सोबत येतो की जेलमध्ये टाकू असा इशारा दिला. यानंतर उद्धव ठाकरेंसमोर शिंदे रडले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे..!

आदित्य ठाकरे म्हणाले , एकनाथ शिंदे यांचं पैशाचं गोडाऊन सापडलं होतं. आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर भाजपने सोबत येतो की जेलमध्ये टाकू असा इशारा दिला. यानंतर उद्धव ठाकरेंसमोर शिंदे रडले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. तर बंड पुकारून सूरतला जात असताना वसईच्या चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मोठी ऑफर दिल्याचे सांगत आपण ती ऑफर नाकारला असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार करत हा मोठा खुलासा केला आहे. आता यावर मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देतात या कडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.