कोल्हापूर (प्रतिनिधी ) – महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ निढोरी गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मागील १० वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रा.संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.

यावेळी निढोरी गावचे माजी सरपंच देवानंद पाटील म्हणाले, महायुतीला जिल्ह्यातून दिवसेंदिवस मिळणारा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, संजय मंडलिकांचा विजय निश्चित आहे.

गोकुळ दूध संघाच्या संचालक युवराज पाटील (बापू) व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

निढोरी गावचे सुपुत्र कु.समर्थ रमेश वाईंगडे यांची अग्निवीर आर्मी जे.डी. मध्ये निवड झाल्याबद्दल नविद मुश्रीफ यांनी त्यांचा सत्कार केला. व भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुधीर पाटोळे, बाळासाहेब तुरंबे, केशव काका पाटील, मनोज भाऊ फराकटे, दत्ता पाटील केनवडेकर, चित्रगुप्त प्रभावळकर, भगवान पाटील, डी.एम. चौगले, विकास पाटील, संतोष मोरबाळे, अरुण पाटील, के. बी. पाटील, रमेश वाईंगडे विश्वास पाटील, हिंदुराव चौगले, राजू पाटील, सचिन पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.