मलकापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील पोलिस चौकी समोरच काही अज्ञात शिवभक्तांनी काल (रविवार) मध्यरात्री विनापरवाना छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापन केला होता. आज (सोमवार) सकाळी प्रशासनाला समजताच येते तणावाचे तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. विनापरवाना स्थापन केलेला हा शिवरायांचा पुतळा स्थलांतरीत करावा, अशी मागणी प्रशासनाच्या वतीन माजी आमदारांसह शिवप्रेमीना केली होती.

मात्र, याला पूर्णत: विरोध करीत आहे त्याच ठिकाणी पुतळा असावा, अशी मागणी शिवप्रेमीनी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. शेवटी पोलिस प्रशासनाने या शिवभक्तांना ताब्यात घेऊन तहसिलदारांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विधीवत पुजा करून हा पुतळा काढण्यात आला.