कोल्हापूर (प्रतिनिधी): यंदाच्या वर्षी मान्सूनची एन्ट्री दमदार होणार असं हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता, यामुळे उष्णतेने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला होता. मात्र सध्या नैॠती मोसमी वाऱ्यांचा अडथळा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवेश थोडासा लांबणीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

मान्सून सध्या कर्नाटक मधील कारवारमध्ये गेल्या तीन दिवसापासून मान्सून रेंगाळला आहे, त्यामुळेच राज्यात अद्यापही उष्णतेचा पारा वाढलेलाच दिसून येत आहे. सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार अंदाजानुसार आणखी काही दिवस नागरिकांना उन्हाच्या चटक्यांचा  त्रास सहन करावा लागणार आहे. यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षित वेळेपेक्षा लवकर झाले होते, 29 मे ला मान्सूनने केरळ मध्ये एंट्री केली होती, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तो कर्नाटकच्या कारवार पर्यंत पोहोचला. अशातच गोव्या मध्ये निर्माण झालेल्या पोषक वातावरणाचे मान्सून दोन दिवसात केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याचा होता. पण हवामानात अचानक मौसमी वाऱ्यामुळे बदल झाल्यामुळे मान्सूनच्या  महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे आणखी काही दिवस महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.