मुंबई (प्रतिनिधी) : लव्ह जिहादविरोधात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापन करणार आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे, याची ही समिती माहिती घेणार आहे.

पुढील सात दिवसांत १० सदस्यांची समिती स्थापन होणार आहे. या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती प्रयत्न केले जाणार आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्य सरकारमध्ये हालचाली सुरू असताना सरकारने अजून एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.