टोप ( प्रतिनिधी ) पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागांव फाटा येथे कर्नाटक राज्यातील कत्तलखान्यात जनावरे घेवून जाणारा मिनी ट्रक प्राणी मित्रांनी पोलिसांच्या मदतीने पकडून सुमारे 5 लाख 18 हजारांचा मुददेमाल ताब्यात घेवून जणावरे गोशाळेत पाटवण्यात आली.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी पेठवडगांव येथील आठवडा बाजारातून गोवंश जातीची गायीची वासरे, व म्हैशीची पारडी ही जनावरे कत्तल करण्याच्या उददेशाने कर्नाकच्या दिशेने सुझुकी कंपनीची सुपर क्यारी मिनी ट्रक क्रमांक एम एच 09 जी जे 1671 या मालवाहतुक गाडीमधून घेवून जात असताना काही प्राणी मित्राना शिये फाटा येथे दिसल्यावर त्यानी गाडीचा पाठलाग करून नागांव फाटा येथ गाडी आडवली.

यावेळी चालकाकडे जनावरांबाबत चौकशी केली असता त्याने गोवंश जातीची वासरे व म्हैशीची पारडी ही स्वप्नील मधुकर सुर्यवंशी यांची आहेत.व ती कर्नाटक राज्यात संकेश्वर येथे असलेल्या कत्तल खान्यात सोडण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. यामध्ये 7,000 किमतीचे गोवंश जातीची गायीची वासरे व 11,500 म्हशीची 23 पारडी असे एकुण 5.18,500 किंमत मुददेमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यावेळी प्राणी मित्र वैभव जाधव, आशिष बारिक तसेच शिरोली येथील अर्जुन चौगुले, सुजित करके, नितीन दळवी, प्रशांत पाटील निलेश लंबे, विनोद यादव, आदींचे सहकार्य लाभले.