मुख्यमंत्री शिंदेचा कोल्हापुरातील दसरा चौकात आज मेळावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांच्या हस्ते आज महापूर नियंत्रण, आंतरराष्ट्रीय कन्व्हेक्शन सेंटर उभारणे, केशवराव भोसले नाटयगृहाची उभारणी आदी सुमारे 4500 कोटी रूपयांच्या विकासकामांचा प्रारंभ होणार आहे. सा.… Continue reading मुख्यमंत्री शिंदेचा कोल्हापुरातील दसरा चौकात आज मेळावा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदे गटाकडून कोल्हापुरात आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना, तमाम मराठी जनतेला प्रोत्साहन देणारा आहे.… Continue reading मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल शिंदे गटाकडून कोल्हापुरात आनंदोत्सव

शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी घेतला होता ‘हा’ निर्णय ..?

मुंबई (प्रतिनिधी) : राज ठाकरेंनी शिवसेना हा राजकीय पक्ष सोडून ‘मनसे’ हा स्वत: चा पक्ष काढला. राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली..? याबद्दल आजही चर्चा होताना दिसतात. आता राज ठाकरेंनीच या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘येक नंबर’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पार पडला या सिनेमाशी राज ठाकरेंचं खास कनेक्शन असल्याची माहिती आता समोर आली आहे.… Continue reading शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी घेतला होता ‘हा’ निर्णय ..?

शिवसेनेचे संसदीय नेते श्रीकांत शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे महाराष्ट्र राज्यात जनसंवाद दौरा करत आहेत. या दौऱ्यात विधानसभा निहाय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद व आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात पार पडणार असून, दि.03व 04 सप्टेंबर 2024 रोजी खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा… Continue reading शिवसेनेचे संसदीय नेते श्रीकांत शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

ट्रॅफिक पोलिसांना राखी ; शिवसेनेच्या महिला आघाडीचे रक्षाबंधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 24 तास कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांना सण उत्सव साजरे करायला मिळत नाहीत. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त सोमवारी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या (ट्रॅफिक ब्रॅंच) पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी हा उपक्रम राबवला. पोलिस का गहिवरले…? नागरिकांनी सण-उत्सव उत्साहाने आणि सुरक्षितपणे… Continue reading ट्रॅफिक पोलिसांना राखी ; शिवसेनेच्या महिला आघाडीचे रक्षाबंधन

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत जोडण्या ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी जुळवाजुळव केली जात आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ही दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य चेहरा म्हणून ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन… Continue reading मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत जोडण्या ?

मी फक्त शिकायला गेलतो ; भाजपच्या माजी आमदाराची ठाकरे सेनेत वापसी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर विरोधी पक्षातील अनेक नेते हे मविआ सोबत असणाऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. आज भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे. कुथे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.आज शुक्रवारी (ता. 26 जुलै)… Continue reading मी फक्त शिकायला गेलतो ; भाजपच्या माजी आमदाराची ठाकरे सेनेत वापसी

आधी राजकीय निवृत्ती अन् आता विधानसभा लढण्याची घोषणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आगामी विधानसभा लढण्याची घोषणा केली आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याच चंद्रकांत खैरे म्हणालेत. खैरे यांच्या या घोषणेमुळे ठाकरे गटातील अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. पण लोकसभा निवडणुकीवेळी खैरे यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता खैरे… Continue reading आधी राजकीय निवृत्ती अन् आता विधानसभा लढण्याची घोषणा

राज्यात विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात ; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ही लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीचा प्रचार करत होते. त्यामुळे येणारी आगामी विधानसभा निवडणूक एकत्रिक लढतील असा अंदाज होता. मात्र राज ठाकरे यांनी एक महिन्यातच भूमिका बदलली असून 288-225 जागा लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेना उद्धव… Continue reading राज्यात विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात ; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

ठाकरे, अजित पवारांचं विधानसभेसाठीच्या जागांचं गणित ठरलं ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती आणि मविआ कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखत आहेत. यातच निवडणुकी आधी जागा वाटपासंदर्भात नेते दावे करू लागले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 288 जागांपैकी 88 जागा लढणार असल्याचे बोलले जात आहेत. तर, ठाकरेही… Continue reading ठाकरे, अजित पवारांचं विधानसभेसाठीच्या जागांचं गणित ठरलं ?

error: Content is protected !!