छगन भुजबळांसह अजित पवार गटातील नेते पक्षांतर करतील ; रोहित पवारांनी सांगितली तारीख

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी मिळावी यासाठी अग्रही होते. परंतु भुजबळांना महायुतीने उमेदवारी दिली नाही आणि अजित पवार गटानेही… Continue reading छगन भुजबळांसह अजित पवार गटातील नेते पक्षांतर करतील ; रोहित पवारांनी सांगितली तारीख

शरद पवारांनी विधानसभेसाठी कंबर कसली, 3 दिवसांत अख्खी बारामती पिंजून काढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना धूळ चारल्यानंतर शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांना शह देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती दौऱ्यावर असून ते संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहेत. निंबुत या गावापासून शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची… Continue reading शरद पवारांनी विधानसभेसाठी कंबर कसली, 3 दिवसांत अख्खी बारामती पिंजून काढणार

सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार ; अखेर उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह विधानभवनात दाखल झाल्या असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (दि. 13 जून) दाखल केला.दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी… Continue reading सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार ; अखेर उमेदवारी अर्ज दाखल

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीनं छगन भुजबळ नाराज ?

मुंबई : प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी २५ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणाची वर्णी लागणार याबाबत तीन-चार नावांची चर्चा होती. अखेर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत.… Continue reading सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीनं छगन भुजबळ नाराज ?

जितेंद्र आव्हाडांचे ‘ते’ भाषण आम्ही मांडत आलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारे : खा. सुनील तटकरे

मुंबई : अधिवेशन संपल्यावर राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तसेच यापुढच्या काळात राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल. तसेच महिलांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.दरम्यान, राष्ट्रवादीची काल बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करणे आणि महिलांच्या… Continue reading जितेंद्र आव्हाडांचे ‘ते’ भाषण आम्ही मांडत आलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारे : खा. सुनील तटकरे

साहेब बारामतीचा दादा बदलायचाय ; कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांकडे मागणी

बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आजपासून तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळपासूनच शरद पवारांच्या गोविंद बागेत कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांकडून थेट बारामतीचा दादा बदला अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अजित पवारांविरोधात आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे.युगेंद्र पवार यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी गोविंद… Continue reading साहेब बारामतीचा दादा बदलायचाय ; कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांकडे मागणी

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या ? ; युगेंद्र पवारांसाठी कार्यकर्त्यांनी मागितली उमेदवारी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतला सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. या मतदार संघात नणंद-भावजंयची लढत झाली. दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर अजित पवार गट बॅकफूटवर आहे. यातच बारामतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नणंद-भावजंयची लढत झाल्यानंतर आता काका-पुतण्याची लढत होणार, अशी चर्चा सुरू… Continue reading बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या ? ; युगेंद्र पवारांसाठी कार्यकर्त्यांनी मागितली उमेदवारी

राष्ट्रवादी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार सोडणार नाही : अजित पवार

मुंबई : शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देशातल्या व राज्यातील जनतेला दिला. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा रौप्यमहोत्सवी… Continue reading राष्ट्रवादी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार सोडणार नाही : अजित पवार

अजित पवार गटाला एका मंत्रिपदाची ऑफर होती, पण…; फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई: दिल्लीत आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा आज (9 जून) सायंकाळी शपथविधी होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. पण महायुतीमध्ये सहभागी असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर देवेंद्र फडणवीसांनी कारण सांगितले आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद ऑफर देण्यात आली होती.… Continue reading अजित पवार गटाला एका मंत्रिपदाची ऑफर होती, पण…; फडणवीसांनी सांगितलं कारण

नागरीकांनी काळजी घ्यावी ; आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सज्ज रहावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि.08 जून) सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर… Continue reading नागरीकांनी काळजी घ्यावी ; आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सज्ज रहावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

error: Content is protected !!