कुडाळ (प्रतिनिधी) : सुपर 30 ने अखेर बहुप्रतिक्षित JEE, NEET and MHTCET क्रॅश कोर्स लाँच केला आहे. यामध्ये इंजीनियरिंग, डेअरी, फिशरी, एग्रीकल्चर, फार्मसी, नर्सिंग, डॉक्टर, आदी कोर्सला सामील होण्याच्या प्रयत्नातील तुमच्या प्रवासाचे हे शेवटचे काही दिवस आहेत. अनेकदा इश्चुक विद्यार्थी त्यांच्या तयारीचा मागोवा गमावतात आणि त्यांच्या वास्तविक क्षमतेपेक्षा कमी गुण मिळवितात.

तसेच या टप्प्यावर तुम्हाला बुस्टरची गरज आहे, ज्याचा वापर नायट्रोस सारखाच आहे, ज्याचा वापर कारचा वेग वाढविण्याकरिता केला जातो. हा तुमच्या तयारीचा मेक किंवा ब्रेकअप टप्पा आहे आणि तुमचे लक्ष्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सूपर 30 चे डायरेक्टर ए. के. सातोस्कर यांनी सांगितले.

15 मार्च पासून सुरू झालेल्या या क्रॅश कोर्सकरीता 12 वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना सूपर 30 चे अकेडमिक डायरेक्टर दिपक कुमार यांनी, लवकरच आपला प्रवेश निश्चित करून उत्तम भविष्याकरिता तयार व्हावे, असे आवाहन केले.