कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवारपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांच्या पॅचवर्कची यादी तयार करण्याच्या सुचना महापौर निलोफर आजरेकर यांनी दिल्या. शहरातील रस्ते दिवाळीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून महापौर आजरेकर यांनी स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती.  

महापौर निलोफर आजरेकर यांनी दिवाळीपूर्वी लवकरात लवकर पॅचवर्कची कामे पूर्ण करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुख्य रस्ते, प्रभागातील वर्दळीचे आणि ९ मिटरच्या वरील रस्ते पॅचवर्क करण्याची यादी तयार करणेच्या सुचना दिल्या. त्याचबरोबर विविध निधीतून ५० कोटीचे रस्ते मंजूर झाले असून या मंजूर केलेल्या रस्तेंच्या ठेकेदारांकडून त्या रस्त्यांची डागडुजी करुन घ्यावी. यासाठी सर्व ठेकेदारांची बैठक आयोजित करावी. ते मंजूर रस्ते सोडून इतर रस्ते पॅचवर्क करण्यासाठी तातडीने निविदा काढण्याच्या सुचना दिल्या.

गटनेते शारगंधर देशमुख यांनी दिवाळीपूर्वी १० तारखेपर्यंत पॅचवर्कची कामे पूर्ण झाली पाहिजेत. यासाठी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची यादी तयार करुन किती रक्कम पॅचवर्कसाठी लागणार याचे एस्टीमेट तयार करा. ज्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे लिकेज आहेत. ते लिकेज काढून घेऊन तेथीलही पॅचवर्क करुन घ्या अशा सुचना दिल्या.

शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी मंजूर ५० कोटी रस्ते सोडून इतर रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी सर्व उपशहर अभियंता पॅचवर्कच्या ठिकाणांची मापे घेऊन एस्टीमेट शुक्रवारपर्यंत सादर करतील. जनरल पॅचवर्कची निविदा मंजूर असून मुदतीमध्ये कामे पूर्ण होण्यासाठी विभागीय कार्यालयावाईज पेव्हर पद्धतीचे पॅचवर्क करण्यासाठी तातडीने निविदा काढू. मंजूर रस्तेवरील पॅचवर्कची कामे संबंधीत ठेकेदाराकडून करुन घेऊ. तसेच मुदतीत असलेले रस्तेही संबंधीत ठेकेदाराकडून दुरुस्त करुन घेऊ असे सांगितले.

यावेळी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, सहा.आयुक्त संदीप घार्गे, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आश्पाक आजरेकर, महेश उत्तुरे आदी उपस्थित होते.