शिरोळ – जयसिंगपूर शिरोळसह परिसरात आज बुधवारी सायंकाळी पहिल्या वळीव पावसाने दमदार लावली हजेरी. दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गारांसह पावसाने हजेरी लावली. शिरोळ तालुक्यामध्ये दुपारी चार वाजता ढगांच्या गडगडाट व वादळासह झालेल्यां पावसाने हवेमध्ये गारवा निर्माण झाला. त्यामुळे उष्णतेने घायाळ झालेल्या नागरिकांना थोडा वेळ दिलासा मिळाला.

तसेच हा पाऊस प्रमुख ऊस पिकासह शेतातील पिकांना पोषक असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे अचानक आलेल्या पावसाने उन्हामध्ये घातलेले धान्य, कपडे, जळण पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महिलाची तारांबळ उडाली होती. यावेळी पहिलांच पाऊस झाल्याने लहान मुलांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतला सुमारे दिड तास झालेल्या पावसाने नागरीकाकांकडून समाधान व्यक्त होत आहे