कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) स्थायी समिती सभा सभापती सचिन पाटील यांनी स्थायी समिती सदस्य, सदस्या यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सभागृहाची मुदत संपण्यासाठी एक महिना राहिलेला आहे. शहरातील विकास कामाचे काय केले आहे. असा सवाल सभापतींनी केला.
यावेवळी नागदेववाडीतील ग्रामीण भागातील लोक परस्पर पाणी सोडतात तेथे चोविस तास पाणी सुरु असते. व्हॉल्व काल सापडले नंतर ते बंद करण्यात आले. त्यानंतर एक तास पाणीचा डिचार्ज वाढलेला आहे. ग्रामीण भागातील पाणी सोडबंद करणारे यांच्याकडून लेखी लिहून घेण्यात यावेत अन्यथा त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शारंगधर देशमुख आणि सत्यजित कदम यांनी केली.
तसेच आयआरबीने बांधलेले चॅनेल चेक करणे गरजेचे आहे. कुठेही संलग्नता नाही. सांडपाणी कनेक्टिव्हीटी नाही. पाणी पास करण्यासाठी सफाई होणे गरजेचे आहे. या चॅनलमध्ये दगड, फळया अडकल्या असल्याचे शारगंधर देशमुख आणि विजयसिंह खाडे-पाटील यांनी सांगितले.
तसेच शहरातील अतिक्रमण, घरफाळ्याबाबत लोकांनी जे पैसे भरलेले आहेत. ते संजय भोसले यांनी पैसे भरलेल्या रक्कमेच्या नोंदी घेतलेल्या नाहीत. याबाबत सिस्टीम मॅनेजर संगणक विभाग यांनी माहिती द्यावी. सायबरटेक चुकिचे केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली नाही. विधी अधिकारी, मुख्य लेखापरिक्षक यांनी ऑडीट केले नसल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केला.
तसेच व्हेंटिलेटर, अँस्टर आधारचे कॅन्सर हॉस्पिटल, कोरोनाबाबतची नागरीकांमध्ये जनजागृती असे विषयांवर चर्चा करण्यात आली.