मुंबई (प्रतिनिधी) :  मनोरंजनसृष्टीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा कपूर यांच्या मुलानेच संपत्तीसाठी त्यांची हत्या केली आहे. मुंबईतील जुहू भागात ही घटना घडली आहे.

४३ वर्षीय मुलाने ७४ वर्षीय अभिनेत्रीची बॅटने मारहाण करत हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी मृतदेह एका बॉक्समध्ये भरून माथेरानच्या जंगलात फेकून दिला. संपत्तीवरून वीणा कपूर आणि त्यांच्या मुलामध्ये वाद सुरू होता. १२ कोटी रुपयांच्या फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या केली आहे.