कोल्हापूर (प्रतिनिधी) :गिरगांव ता.करवीर येथील सर्जेराव कुरणे या कारगिल युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. पुन्हा ही स्थिती कोणावर येऊ नये म्हणुन गावातील सीमेवर तैनात असलेल्या आजी सैनिकांनी गावात सुरू असलेल्या कोविड सेंटरला आज ऑक्सिजन मशीन भेट दिले. गावात सुट्टीवर असलेल्या जवानांनी हे मशीन रुपेश पाटील आणि भास्कर कुरणे यांच्याकडे सुपूर्द केले. सैनिकांची ही मदत लाखमोलाची ठरली आहे.