कोल्हापूर (प्रतिनिधी) : कायद्याने कोठूनही दूध संकलन करण्यास बंदी नाही, त्यामुळे गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करून काही उपयोग नाही, असे स्पष्ट करून आता शेतकऱ्यांचे चांगले केले नाही, तर पुढची निवडणूक लढविणार नाही, असा निर्धार ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. विरोधी गटाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.  

दूध उत्पादकांना २ रूपये जादा दर, पशुखाद्य विक्रीसाठी राज्यभरात बाजारपेठ  मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, शेतकऱ्याला भाव आणि शेतकऱ्याला मानसन्मान हेच आमचे उद्दिष्ट आहे. अमूलसारख्या बाजारपेठेसाठी प्रयत्न केले जातील. वासाच्या दुधाला योग्य ती किमंत देऊन अथवा परत देऊन शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल, असे सांगून सध्या आहे, त्यापेक्षा चांगली आणि मोठी संस्था कऱण्यासाठी सत्ता द्या, असे आवाहन मुश्रीफ यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आ. राजेश पाटील, आ. विनय कोरे आदी उपस्थित होते.