बीड : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांचा भगिनी  पंकजा मुंडे यांना उमेवारी दिली. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचं पुढं काय? त्यांना भारतीय जनता पार्टीकडून दुसरी कोणती जबाबदारी देण्यात येणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आहेत.यातच पंकजा मुंडे यांनी बीडच्या सभेत प्रीतम मुंडे यांच्याबाबत सूचक विधान केलंय. “प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन”, असं पंकजा विधान पंकजा  मुंडे यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलंय.

यावेळी या सभेत बोलताना त्या म्हणाल्या ,मला तिकीट देवू नका म्हणूनच मी पक्ष श्रेष्ठींकडे गेले होते.प्रीतम ताईंना राजकारणात कधीही एकट पडू देणार नाही,त्यांच्यावर कधीही अन्याय होवू देणार नाही असा मी शब्द दिला होता. तुम्ही काही काळजी करू नका प्रीतम ताईंना मी नाशिकमधून उभं करेन.प्रीतम मुंडे राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात आल्या पण मी मुंडे साहेब असताना त्यांच्या सोबत होते.

महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अध्यापही सुटलेला नाही.भाजप,राष्ट्रवादी अजित पवार गट,शिवसेना शिंदे गट यांच्यात या जागेबाबत रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याच सांगितलं होतं.त्यानंतरही अजित पवार गटाचा या जागेवर दावा कायम असल्याच भुजबळ यांनी सांगितलं.अशातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभं करण्याच्या वक्तव्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्याच दिसून येतंय.