कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा भंग केल्याबद्दल आतापर्यंत एकूण ६७ लाख १७ हजार १८५ रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच रात्री ९ नंतर आस्थापना सुरु न ठेवणे, या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.

कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे,असे आवाहन करुन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने ‘मास्क नाही – प्रवेश नाही’ तसेच ‘मास्क नाही – वस्तूही नाही’ ही मोहिम शहरभर गतीमान केली असून, विनामास्क फिरणारे तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्याविरुध्द दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे.