जोतिबा (प्रतिनिधी) : जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवशी आज (गुरुवार) सकाळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा साकारण्यात आली. तसेच आदिमाता आदिशक्ती चोपडाई देवीची भवानी आई छत्रपती शिवरायांना तलवार देतानाची मनमोहक महापूजा बांधण्यात आली.
दख्खनचा राजा श्री जोतिबा यांची पूजा पुजारी अंकुश दादर्णे, शशिकांत भोरे, गणेश बुणे, शनी उपारे यांनी साकारली. आदिशक्ती चोपडाई देवीची भवानी आई छत्रपती शिवरायांना तलवार देतानाची मनमोहक पूजा पुजारी सचिन ठाकरे, कुणाल लादे, अमन ठाकरे यांनी साकारली.