कोल्हापूर ( प्रतिनिधी ) उद्धव ठाकरे गट शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे हे काही दिवसांवरच कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील निष्ठावंत सैनिकांची बैठक मातोश्रीवर पार पडली आहे. या बैठकीत खलबतांना वेग आला असून पक्षश्रेष्ठी यावेळी शिवसैनिकांच्या मागणीवरुन मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या बैठकीत शिवसैनिकांनी उपरा उमेदवार नको आम्हाला लोकसभेसाठी निष्ठावंत शिवसैनिकच उमेदवार म्हणून हवा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी अप्रत्यक्षरीत्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणेंसाठी फिल्डिंग लावली आहे. असल्याचं म्हटलं जात आहे.

तसेच या बैठकीत चेतन नरके हे उपस्थित असल्यामुळे नरके हाती मशाल घेणार का ? असा सवाल केला जात आहे. ह्या चर्चा सुरू असतानाच या बैठकीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरली आहे.

त्यामुळे या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाणार आहे अशी प्राथमिक माहितीसमोर आली आहे. आणि निर्णय घेतला गेल्यास घेतलेला निर्णय आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता निष्ठावंत शिवसैनिकांचे लक्षं आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याकडे असणार आहे. यावेळी संजय पवार, सुनिल शिंत्रे, सुनिल मोदी, विजय देवणे, राजू शेट्टी