कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना पक्षप्रमुख, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ते आणि समाजकारणी बाळ केशव ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह राज्यभरात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञा महेश उत्तुरे ( शहर संघटिका कोल्हापूर उत्तर ) यांच्या राजारामपुरी येथील कार्यालयात बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

महिला आघाडी शहर संघटीका शहर कार्यालय कोल्हापूर शहर राजारामपुरी विभाग येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्त नागरिकांना साखर पेढ्यांच वाटप करण्यात आलं.

यावेळी महेश उत्तुरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेबांच्या विचारानुसार मार्गक्रमण म्हणजे त्यांना खरे अभिवादन आहे असेही म्हटले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित प्रतिज्ञा महेश उत्तरे, महेश उत्तुरे यांच्यासह विशाल देवकुळे, रघुनाथ टिपूगडे, सनराज शिंदे अल्ताफ मकानदार, उमेश उत्तरे, योगेश लोंढे, संदीप देवकुळे, सुरज कांबळे, चेतन जाधव, रणजीत मोहिते, दत्ता गायकवाड, सुशील संकपाळ, पवन पोळ, शिवराज जाधव, विशाल देशपांडे, विशाल जाधव, पृथ्वीराज मिरांजे, अक्षय पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.