बेळगाव: बेळगावमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावत्र आईने चिमुकलीचा बळी घेतला असल्याची घटना कंग्राळी गावात घडली आहे. तीन वर्षांच्या मुलीचा तिच्या सावत्र आईनेच हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. समृद्धी रायन्ना न्हावी (वय 3) असे मृत बालिकेचे नाव आहे.

दरम्यान, घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, बेळगावच्या कग्राळी गावात राहणाऱ्या एका कुटुंबाने तीन वर्षीय समृद्धी रायन्ना न्हावी हिची सावत्र आई सपना हिने निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे. सपनावर समृद्धीची आजी आणि काका यांनी हत्येचा आरोप केला आहे.

समृद्धीच्या वडिलाने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले होते, ते सीआरपीएफ सैनिक म्हणून कार्यरत आहेत. रायन्ना आणि त्यांच्या कुटुंबावर पहिली पत्नी भारतीच्या हत्येचा आरोप आहे. २०२१ मध्ये पती रायन्ना, आई शोभा, बहिण रूपा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे होती.