कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनुकंपा तत्वावरील वर्ग तीन आणि वर्ग चार मधील उमेदवारांची सामायिक सुची kolhapur.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यादी संबधित उमेदवारांच्या निर्देशनास आणून त्याबाबत त्यांची दिनांकित स्वाक्षरीची पोहोच व त्यांचे हरकती, दुरुस्ती असल्यास त्याबाबत हरकत अर्जाचे प्रतीसह ३० ऑक्टोबर पर्यत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.

सर्व शासकीय कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अनुकंपा उमेदवारांच्या माहितीच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयाची मिळून एकत्रित यादी करण्यात आली आहे. अनुकंपा तत्वावरील वर्ग तीन व वर्ग चार च्या उमेदवारांची सामायिक सूची तयार करण्यात आली आहे. अनुकंपा तत्वावरील वर्ग तीन, वर्ग चारमध्ये ज्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत व ज्यांचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त झाले आहे, अशा उमेदवारांची नावे सामायिक सूचीतून वगळण्यात आलेली यादी नमूना परिशिष्ट ड मध्ये तयार करण्यात आली आहे.