मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार छोटे नेते असल्याचे विधान केल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांचे कौतुक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण शरद पवार यांच्यावर पीएचडी करत आहेत. शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचे कौशल्य खरोखर मोठे आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले आहे.

पवारांच्या इतका अभ्यास कुणाचा नाही. शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.