पन्हाळा (प्रतिनिधी) : जागतिक जल दिननिमित्त पन्हाळा आयटीाय येथे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे तांत्रिक विभागीय अधिकारी अभिषेक शिंदे, एरिया मॅनेजर नितीन चव्हाण उपस्थित होते.

यावेळी पाण्याचे महत्व, त्याची उपयुक्तता तसेच पाण्याची जास्तीत जास्त बचत करणे ही काळाची गरज आहे असे मत अभिषेक शिंदे यांनी व्यक्त केले. तर प्रशांत कांबळे यांनी जल संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे प्राचार्य एस. डी. देवधर यांचे मार्गदर्शन लाभले.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी नईम नदाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेस संस्थेतील सर्व विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.