कोल्हापूर (प्रतिनिधी) : हाथरस येथील हत्याकांडा बाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार पी एन पाटील, महापौर-उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेस सचिव संजय पाटील, सचिव तोफिक मुलांनी, शारंगधर देशमुख, दुर्वास बापू कदम आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी संजय पाटील म्हणाले, हाथरस निर्गुण हत्याकांडातील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हावी. तसेच सीबीआय आणि एसआयटी हे नरेंद्र मोदी यांच्या हातातील बाहुले असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत समिती निर्माण केली जावी. परत सत्य बाहेर पडेल तसेच महाराष्ट्रात कंगना आणि सुशांत सिंग यांच्या बाबत गळे काढणारे भाजपचे नेते या गंभीर विषयावर मूग गिळून गप्प आहेत, हे अतिशय धोकादायक आहे.

नरेंद्र मोदी म्हणतात, बेटी पढाव बेटी बचाव त्या नरेंद्र मोदींनी या प्रकरणावर अवाक्षरही काढले नाही. देशांमध्ये अराजकता माजविण्याचा प्रयत्न असून सवर्ण विरुद्ध दलित असा संघर्ष उभा करण्याचे पाप उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्रातील सरकार करीत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.