कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज एकत्रितरित्या ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहिला. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत’अब की बार 400 पार’ या भाजच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सद्याची स्थिती पाहता भाजपने आत्मविश्वास गमावला आहे. बहुमत आहे तर पक्ष फोडण्याची वेळ का येते ? हा सवाल त्यांना आता सतावतो आहे. त्यामुळे किमान 400 की 200 जागा पार करणार का ? हे जनताच ठरवेल. तसेच भाजपची प्रतिमा चांगली आहे तर त्या विकास कामावरच त्यांनी निवडणूक लढवावी असा ही सल्ला दिला.

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातिभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची दारे महात्मा जोतिबा फुले यांनी खुली करुन दिली. एका महात्म्याच्या आयुष्याचा वेध घेताना त्याची जडणघडण कशी झाली ? शिक्षणामुळे मिळालेले विचार आणि स्वत:च्या सखोल निरीक्षण-अभ्यासातून त्यांनी कमावलेले विचार समाजात कसे झिरपत गेले याचे अत्यंत सहज आणि वास्तवदर्शी पद्धतीने केलेले चित्रण ‘सत्यशोधक या चित्रपटात पाहायला मिळते. दोन तासाचा हा चित्रपट पाहताना आमदार सतेज पाटील हे देखील भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले.

कोल्हापुरातील नागरिकांसाठी दोन दिवस सत्यशोधक चित्रपट कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत दाखविण्यात येणार आहे. याची तिकिटे कॉग्रेस कमिटीच्या कार्यालयातून देण्यात येतील, असेही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. शिवाय, सत्यशोधक चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशादर्शक ठरेल. असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

मात्र सत्य हे आहे की, त्यांचा आत्मविश्वास गेल्यानेच ते पक्ष फोडाफोडी प्रयत्न करत आहेत. तसेच सत्यशोधक चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशादर्शक ठरेल. कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हा प्रयत्न झाला होता, मात्र कोल्हापूरकरांनी हा प्रयत्न हाणून पाडल्याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.