मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. वार पलटवार करत काही नेते अनेक गोफ्यस्फोट देखील करत आहे. अशातच आता नेत्यांची टीका आता महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत येऊन पोहचली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या एका वक्तव्यव्यावर निशाणा साधला आहे. मोदी यांच्या काळात महिलांना आपली मंगळसूत्र विकावी लागली अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. ज्या माणसाने घरातील मंगळसुत्राला मान दिला नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करु नये. असं खोचक वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत..?

काँग्रेस आई-बहिणींचं मंगळसूत्र शिल्लक ठेवणार नाही. असे म्हणत राजस्थान मधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोंदीवर हल्लाबोल चढवला आहे. मोदींनी जी नोटबंदी आणली त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्रं गहाण ठेवावी लागली, विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केलं हजारोंचा जो रोजगार गेला. त्यावेळेला लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावं लागलं. काश्मीरमधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्रं ही मोदी पुरस्कृत, भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूरमध्ये देखील महिलांची मंगळसूत्रं गेली. त्याला देखील मोदीच जबाबदार आहेत. किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली? या देशात महिलांच्या मंगळसूत्रावर गंडांतर आलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळंच असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यांच्या या आरोपांवर पंतप्रधान मोदी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.