मुंबई – लोकसभेचं बिगुल सध्या राज्यात घुमत आहे. सध्या सगळी पक्ष आपल्या प्रचाराला लागले आहेत. विरोधी पक्ष नेत्यांचे सुद्धा आरोप प्रत्याआरोप पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अपशब्द शब्दांमध्ये टीका केली आहे . संजय राऊत बांग देणारा कोंबडा असे म्हणत खासदार संजय राऊतांवर मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन

गिरीश महाजन राऊतांवर हल्लाबोल करताना म्हणाले, संजय राऊत म्हणाले होते याची लायकी काय?, अरे मी सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून आलो आहे. तूम्ही राज्यातील कोणत्याही मतदार संघातून उभे राहून निवडून येऊन दाखवा… घरात बसून सकाळी उठलं की कोंबड्या सारखी बांग देत बसतो आणि आमची काय लायकी काढतो, अशा खोचक शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. ते बांग देणारे कोंबडे आहेत ते बांग देत राहतील, असं म्हणत गिरीश महाजनांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

गिरीश महाजन पुढे म्हणाले, माझी औकात महाराष्ट्राला माहित आहे. तुम्हाला सुद्धा माहित आहे. राऊत तुम्ही फार अशी बाग देऊ नका. एखादी लोकसभा घ्या जी तुम्हाला सगळ्यात सोपी आहे. जिथे तुमची जागा निवडून येईल तिथं उभे राहून दाखवा. जनतेमध्ये निवडून येऊन दाखवा आमदार होऊन दाखवा, खासदार होऊन दाखवा. मग तुम्हाला तुमच्या औकात कळेल. माझी औकात काय काढता मी सात वेळेस निवडून आलेला आहे. असा म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिले आहे. यावर खासदार संजय राऊत काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे.