कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील कंपन्या कोल्हापुरात येऊन जादा पैशाचे आमिष दाखवून लोकांना फसवत आहेत. अनेक बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या विकास खुडे आणि त्यामध्ये सामील असणाऱ्या सर्व आरोपींवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांची प्रॉपर्टी सील करावी अशी मागणी कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पद्मा कदम यांच्याकडे केली आहे.