गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने गारगोटी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मी मेडिकलचे मालक संजय रघुनाथ पाटील यांचा २०२०-२१ चा उत्कृष्ट सभासद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य केमिस्ट असोसिएशनचे संघटन सचिव मदन पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

संजय पाटील यांचे गारगोटी येथे मागील तीस वर्षांपासून औषध कंपन्या, डॉक्टर्स, रुग्ण यांच्यामध्ये चांगला समन्वय ठेवून संघटनेच्या नियमाप्रमाणे चांगले कार्य केले त्यामुळेच त्यांची उत्कृष्ठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे मदन पाटील म्हणाले

या कार्यक्रमास जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे, पश्चिम विभागीय उपाध्यक्ष रविंद्र पाटील, सचिव शिवाजीराव ढेंगे, प्रल्हाद खवरे, भरतेश कळंत्रे, कुमार बोरगांवे, सचिन पुरोहित, भुजंग भांडवले, शशिकांत खोत, रत्नाकर देसाई यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते