कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यात तारेवाडी येथे जाऊन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आंदोलन केले. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. 

खोत म्हणाले की, शेतकऱ्यांना केंद्राने मदत करावी असे म्हणत राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. पण, शेजाऱ्याच्या खाटल्यावर जाऊन संसार करता येत नसतो. बाळंतपण करता येत नाही. पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. त्यांना प्रतिहेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी, तातडीची २५ हजारांची मदत घ्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका राज्य सरकारने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.