मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात वातावरण गंभीर असताना दुसरीकडे उपमुख्यंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी रायपूरच्या दौऱ्यावर होते. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर बोचरा वार केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार एक्स या समाज माध्यमावरील आपल्या अधिकृत हँडलवरून रोहित पवार यांनी पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल करत काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

महाराष्ट्र होरपळतोय पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडे जाताहेत. कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस, आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार असा टोला लगावला आहे.