सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, डावी आघाडी व  समविचारी पक्षाच्या वतीने  बीडशेड (ता.करवीर) येथे  गुरूवारी (दि.५)  सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे यांनी पत्रकाद्वारे दिली.

दरम्यान, जिल्ह्यातही ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असून या आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा उदय नारकर, जनता दल सेक्युलरचे वसंतराव पाटील, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, स्वराज्य इंडियाचे इस्माईल समडोळे   आदी सहभागी होणार आहेत.