साळवण (प्रतिनिधी) : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या संकल्पनेतून आणि काँग्रेस नेते कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात आज (शनिवार) संपूर्ण कोल्हापूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात केंद्रीय भाजपा सरकारने विरोधी पक्षाची मते जाणून न घेता असंसदीय पद्धतीने आवाजी मतदानाने शेतकरी-कामगार वर्गाला भांडवलदारांच्या दावणीला बांधणारे अन्यायकारक काळे कायदे समंत करून घेतल्याच्या विरोधात तसेच हाथरस येथील पिडीतेच्या कुटुंबियांची विचारपूस आणि त्यांचे सांत्वन करण्यास जात असलेले काँग्रेस नेते राहूल गांधी व प्रियंका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी निवडे साळवण येथे भव्य धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती संगिता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, माजी सभापती चंद्रकांत खानविलकर, कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ता बयाजी शेळके, निवडे सरपंच दगडू भोसले, करवीर विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष संदीप पाटील, कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख संभाजी पाटील, युवक काँग्रेस सरचिटणीस सुर्यकांत पडवळ, माजी सरपंच सहदेव कांबळे, दादू पाटील तसेच तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.