कोल्हापूर(प्रतिनिधी) : निवृत्ती वेतनधारकाकडून निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी मागविण्यात आलेली माहिती कोषागार कार्यालयास सादर करण्यास कोणतीही कालमर्यादा नसल्याने कार्यालयात गर्दी करू नये. आवश्यक माहिती पोस्टाद्वारे अथवा to.kolhapur@zillamahakosh.in या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे यांनी केले आहे.


राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून संबंधिताकडून माहिती मागणी करण्यात आली आहे. ही माहिती सादर करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कोणतीही कालमर्यादा नसल्याने निवृत्ती वेतनधारकांनी कोषागार कार्यालयात गर्दी करु नये. सध्या कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव असल्याने निवृत्ती वेतनधारकांनी आपली माहिती पोस्टाद्वारे अथवा ईमेलवर पाठवावी, असे आवाहनही कोषागार अधिकारी कारंडे यांनीही केले आहे.