कोल्हापूर (प्रतिनिधी) : वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे ५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. वृक्षप्रेमी संस्थेकडून डांगे गल्ली तरुण मंडळ, बुधवार पेठ येथील २ फणस, २ जांभूळ आणि १ आंबा अशा ५ झाडांचे पंचगंगा नदी समाधी मंदीर परिसरात पुनर्रोपण करण्यात आले.

यावेळी गतवर्षी लावलेल्या ७५ जुन्या झाडांभोवतालचे गवत काढणे, आळी करणे, प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल्स गोळा करण्यात आले. यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, साजिद शेख, अनुज वागरे, हर्षवर्धन पाटील, रितेश साळेकर, सविता साळोखे, प्रविण डांगे, सचिन पोवार, शैलेश टिकार, अक्षय कांबळे, तात्या गोवावाला, डॉ. डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठ विद्यार्थी व स्थानिक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.