कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरी, टाकाळा आणि दौलतनगर परिसरातील पाणी बिल थकीत ठेवणाऱ्या कनेक्शन धारकांकडून ६ लाख ६७ हजार ५७७ रुपयांचे पाणी बिल वसूल केले. यापुढील काळात थकीत पाणी बिलाची वसुली गतीने केली जाणार असल्याचे  पाणीपुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख मोहन जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, थकीत पाणी बिलासाठी पथकाने राजारामपुरी येथील एका कनेक्शन धारकाची पाणी कनेक्शन बंद केली आहे. ही कारवाई मीटर रिडर बाबासो कवाळे, रमेश मगदूम, फिटर तानाजी माजगांवकर यांनी केली.

थकीत पाणी बिलासाठी विशेष पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याने नळ कनेक्शन धारकांनी आपले थकीत व चालूचे पाणी बिल तत्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन शहर पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता नारायण भोसले यांनी केले आहे.