कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिलासादायक बाब अशी की, दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ३५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २१०२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ८ , करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १,शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ३आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,०२१.

एकूण डिस्चार्ज : ४६,९११.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ४३४.

एकूण मृत्यू : १६७६.