कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते याचा आज (मंगळवार) शिवसेनेसह सकल मराठा समाजाच्या वतीने पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी सदावर्तेंच्या प्रतिमेचे दहन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. तर इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी करवीर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रामभाऊ मेथे, राजा पाटील, भीमराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
या आंदोलनात शिवसेना करवीर तालुका महिला अध्यक्षा वंदना पाटील, करण पाटील, अनिल कोळी, बाबू पिष्टे, विकी माने, अदित्य कारंडे, रवी शिरोडकर, अमित पाटील, सागर पवार, सतिश सरनोबत, ऋषिकेश चौगुले, धनाजी भोसले, अक्षय चोगुले, शिवसेना संपर्क प्रमुख महादेव पाटील यांच्यासह परीसरातील्या गावातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.