दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : इस्पुर्ली (ता. करवीर) येथे ब्लॅक पँथर पक्ष आणि महिला बचत गटांच्या वतीने मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे, यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी मायक्रो फायनान्स कर्ज माफ करावे, यासाठी घोषणाबाजी केली. कोरोनामुळे गेली ६ ते ७ महिने काम नसल्यामुळे मायक्रो फायनान्स हप्ते कसे भरायचे ? हा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. व आपल्या मागण्यांचे निवेदन इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी चव्हाण यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी सुभाष देसाई, विजय माने, विश्वास कांबळे, संतोष साटम, बाबूराव जैताळकर, संगिता पाटील, पुजा साठे, सविता माने, शोभा चौगले त्याचबरोबर पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.