मुंबई : रामदास तडस यांच्या सुनेनं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तडस कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पूजा तडस यांनी तडस कुटुंबीयांनी माझ्यावर अन्याय केला आहे. माझा प्रचंड मानसिक छळ केला आहे. दरम्यान, पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केले आहेत. तसंच, त्यांनी यावेळी वर्ध्यातून अपक्ष लढणार असल्याचीही घोषणा केली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप केले जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यावेळी बोलताना पुंजा तडस म्हणाल्या की, मला मुलं झालं त्यावेळी तडस परिवाराकडून बोलण्यात आलं की, हे बाळ कोणाचं? या बाळाची डीएनए टेस्ट करा, असे आरोप करण्यात आले. मला रॉडनंही मारण्यात आलं, मोदीजी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहेत. मी पंतप्रधान मोदींना एक विनंती करते की, माझ्या मुलाला न्याय द्या. मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्यावा आणि त्यांनी मला न्याय द्यावा.

तर दुसरीकडे पूजा यांचे पती आणि रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मला हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न होतोय, पूजा आणि माझ्या सहा केसेस कोर्टात आहेत, असं पंकज तडस म्हणाले. तसेच बाळाच्या डीएनए चाचणीवर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने उत्तर देण्यास पंकज तडस यांनी नकार दिला आहे.

पंकज तडस म्हणाले, विरोधकांना सोबत घेऊन सुरू असलेला सुनियोजीत प्लान आहे. लोकसभेत उभे राहायचे तर लोकसभेला उभे राहण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी पैसा कुठून येतो? यामध्ये दोन मोठ्या राजकरणी सहभागी आहेत. रामदास तडस यांचे तिकीट कापण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे या संदर्भात पुरावे आहे. 2019 आणि 2024 साली देखील हे प्रयत्न केला आहे. विरोधकाचे षडयंत्र असून विरोधकच सगळा मालमसाला पुरवत आहे.आमची तिकीट कसा कापले जाईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शंभर टक्के विरोधकांचा राजकीय डाव आहे.